Type Here to Get Search Results !

नांदल गावातील पाच तरुण इंडियन आर्मी मध्ये भरती.

 13/1/2026

नांदल गावातील पाच तरुण इंडियन आर्मी मध्ये भरती. 


नांदल गावातील पाच तरुण भारतीय सैन्यामध्ये भरती झाल्याची बातमी नांदल गावातील ग्रामस्थांना समजताच गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर गावकऱ्यांनी नांदल गावातील श्री भैरवनाथ मंदिरामध्ये या पाचही तरुणांना एकत्र घेऊन त्यांचा सत्कार केला. व गुलालाची उधळण करत रण हलगीने वातावरण दुमदुमून सोडले. अनेक वर्ष ही मुले भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी मेहनत घेत होती. आज त्यांच्या मेहनतीला यश आले. या मुलांचे पालक बोलत असताना खरंतर ते भाऊक झाले होते. व काही जणांच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू होते. गावच्या यात्रेनिमित्त नांदल गावातील भारतीय सैन्याचा एक बॅनर लावला जातो. व या बॅनर वरती आपलाही फोटो असावा, अशी अनेक मुलांची अपेक्षा होती व अनेक मुलं यासाठी मेहनती घेत आहेत. त्यापैकी या पाच मुलांचे भारतीय सेना मध्ये सेवा करण्याचे स्वप्न साकार झाले.भारतीय सैन्यामध्ये निवड झालेल्या तरुणांमध्ये (१) इरफान शब्बीर पठाण (२) सुदीप सतीश सरक (३) प्रेम अण्णा कोळेकर (४) शुभम दादा कोळेकर (५) प्रतीक सुरेश कारंडे यांना सरपंच सौ वृषाली नितीन कोळेकर यांच्या निवासस्थानी या पाचही तरुणांना एकत्र बोलवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस नांदल गावचे माजी सैनिक सुभेदार मेजर श्री तुकाराम कोळेकर यांनी या तरुणांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री शिवाजी कोळेकर, श्री सचिन कोळेकर, श्री सचिन गुळदगड, श्री भानुदास सरक, श्री प्रशांत कोळेकर, श्री दत्तात्रय कारंडे, श्री किसन कारंडे ,श्री दादा कोळेकर, श्री सचिन आटके, श्री तुकाराम कोळेकर फौजी, श्री सुनील निंबाळकर ,श्री अक्षय जाधव, श्री दादा जगताप, श्री गणेश मोहिते, श्री मल्हारी कोळेकर, श्री शब्बीर पठाण, श्री देवदास कोळेकर, श्री शामराव करे, श्री बाळू आटके, श्री रामदास शेंडगे, श्री संतोष सोनबा कोळेकर, श्री योगेश कोळेकर, संदेश कोळेकर, श्री सचिन तुकाराम कोळेकर, श्री हनुमंत कोळेकर, श्री पांडुरंग दादा कोळेकर, श्री विनायक यशवंत कोळेकर, श्री सुरेश कारंडे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री अजित उर्फ पप्पू कोळेकर यांनी कार्यक्रमाच्या सत्कार समारंभाचे नियोजन केले.











Post a Comment

0 Comments