आज दिवसभर मलवडी ता . फलटण येथे जिओ कंपनीच्या नेटवर्कचे I2 वाजले होते. सकाळी अकरा वाजल्या पासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत पर्यंत जिओ GIoकंपनीच्या कोणत्याही सिम व मोबाईल ला रेंज नव्हती. यामुळे कोणालाही कोठेही फोन करता येत नव्हते. यामुळे गावातील नागरीकांचा जनसंपर्क तुटलेला होता. जिओ कंपनीचे रिचार्ज आज इतके महाग झालेले आहेत. तरीसुद्धा आज लोक नाईलाजास्तव हे रिचार्ज करत.. आहेत. आजच्या झालेल्या नागरिकांच्या गैर सोईला जबाबदार कोन. कंपनीचे रिचार्ज हे 28 दिवसाचे असतात परंतु आजच्या या झालेल्या नुकसानीचे कंपनी कशी भरपाई करून देणार. आजचा हा वाया गेलेला दिवस कंपनी वाढवून देणार का? हा खूप मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरामध्ये जिओ 5G चा आनंद लोकांना घेता येत आहे. परंतु गावामध्ये 4G रेंज सुद्धा लोकांना व्यवस्तीत मिळत नाही. आणि जर मिळाली तर ति सातत्याने नागरिकांना मिळेलच हे काही सांगता येत नाही. नेते मंडळी आपल्या भाषणात मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतात परंतु गाव तेथे 5 G रेंज ते लोकांना देवू शकत नाहीत. शाहराच्या तुलनेत गावाकडे नेत्यांचे दुर्लक्ष होताना आपलाला पाहायला भेटत आहे.

Post a Comment
0 Comments