Type Here to Get Search Results !

No title

 #कथाविश्व 

*कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो.यात माझी काय चूक होती?*

*मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं,कारण मी क्षत्रिय नव्हतो.*

*परशुरामांनी मला विद्या दिली,पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल.कारण मी क्षत्रिय नव्हतो!*

*एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.*

*द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.*

*कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.*

*मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.*

*तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"*

*कृष्णाने उत्तर दिले 😘

*"कर्णा,माझा जन्म कारागृहात झाला.*

*जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता.*

*रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.*

*तुम्ही तलवारी,रथघोडे,धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.*

*मला गौशाला,शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.*

*ना कोणती सेना,ना शिक्षण.*

*मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे,असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.*

*तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.*

*सांदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.*

*तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले.*

*माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही,तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.*

*मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.*

*मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.*

*जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल.धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल...फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.*

*एक गोष्ट लक्षात घे कर्णा...*

*प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत*

*आयुष्य कोणासाठी ही कधी ही सोपे नाही*

*दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.*

*परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...*

*कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,*

*कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,* 

*कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,*

*तरी ही*

*त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.*

*तक्रारी थांबव कर्णा!*

*आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.*

*म्हणून,तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा,कृतज्ञता व्यक्त करा,चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा.स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद...!*

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

*पायातून काटा निघाला की चालायला मजा येते,तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते.*

कथाविश्व  - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

Post a Comment

0 Comments